लंगडा घोडा...

लहानपणापासून मी हुशार समाजाला जायचो... वडिलांच्या मार्कांच्या वलयामुळे मला हुशारीचा टॅग ऑटोमॅटिक आला होता... सगळे ठीक होत्ते पण मला अभ्यास ह्या गोष्टीचा कंटाळा यायचा... अभ्यासाच्या खोलीमध्ये निवांत झोपायचो... अगदी १० वी, १२ वी च्या परीक्षेच्या काळात पण...!!! आळशी, कशासाठी जन्म झालाय आपला हे माहिती नसलेला... दिशाहीन...!!!
बराच काळ घरात असून पण एकटा असलेला, मित्र (फारसे) नसलेला, एकटा जीव सदाशीव...!!! वडिलांची स्वप्नं खुप सारी, एकाने डॉक्टर व्हावं, एकानं इंजिनियर, मुलीने शिक्षक.... माझे सोडून सगळे झाले.... आयुष्याला दिशाच मिळाली नाही... समुद्रमध्ये नावाड्याविना भटकत आललेल्या शिडाच्या जहाजा प्रमाणे....!!! वारा माझी दिशा ठरवायचा.... मार्ग तयार करायचा प्रश्नच नव्हता.... समोर दिसेल त्या मार्गाने चालायचे एवढेच मला माहिती होते....
माझ्या मित्रांना वाटते की माझ्याकडे फार टॅलेण्ट वगैरे आहे... माझ्यात काही तरी असामान्य करायची ताकद आहे... माझ्या शिक्षकांना वाटायचे की मी वेगळा आहे... माझ्या बहिणीला देखील हेच वाटत असतं... मला वाटायचे की माझी अबिलिटी आहे म्हणूनच सगळे ऐकून घेतात... प्रेमापोटी सारे जन माझा माज, माझा गुरुर आणि माझे वागणे सहन करत होते.



मी उद्धट आहे, मानसिक रोगी आहे.... आळशी आहे... अप्पलपोटी आहे, मगरुर आहे, सायको आहे... मला जे करायचे आहे त्याची सुरूवात देखील नाही केली मी.... आणि माझे वय आज ३० च्या घरात आहे. माझ्या आयुष्याच्या शेवटी (जर तेवढा विचार करावा एवढा वेळ असे एवढा जगलो तर....) मला मी आयुष्यात काहीच केले नाही याची खंत कायम राहिली तर मग माझा अंत दुखावह आहे....
माझ्या प्रियजणांनी एका लगंड्या घोड्यावर डाव लावलाय हे मला कळून चुकलेय... बघू आता जीवनाच्या रेस मध्ये किती वेळ आणि किती लांब पळता येते ते... त्यांचा इच्छा, अपेक्षा साठी पाळायला पाहिजेच... मग माझी इच्छा असो किंवा नसो...
धांदरट मुलांच्या रांगेत बसायचॊ मी अन तु बसायची हुशार मुलींच्या रांगेत,
मठ्ठ होतो मी, पण तु किती हुशार होती...
प्रार्थनेच्या वेळी तु पसायदान किती सुंदर म्हणायचीस,
... माझ्या मरगळलेल्या चेहरयावर तु अनोखे तेज आनायचीस..
माझ नाव नेहमी ब्लकलिस्ट मधे दिसायच, तुझ नाव मात्र शिक्षकांच्या तोंडून फेमस व्हायच...
तुझं हे सत्र असचं कायम राहील, माझं स्वप्न असच यशापासून दुर जात राहीलं..
तु संगीतात एक नंबर असायची खेळामधे मात्र माझीच अव्वल बाजी असायची..
मास्तरांनी माझी फजिती केली की तु किती गालातल्या गालात हसायची...
एकदा मात्र खरोखर झाली कमाल, एका नाटकात तु झाली प्रवासी अन मी झालो हमाल..
त्यावेळेस तुझ्या अभिनयाशी स्पर्धा करताना खरोखर मी झालो होतो बेहाल...
भोंडला असायचा तुम्हा मुलींचा आम्हाला मात्र सुट्टी असायाची..
पण तुला साडीत पहायचं म्हणून माझी त्या भिंतीवरून नेहमीच डोकावणी असायची..
एकदा हिम्मत केली मी अन सांगितल माझ्या ह्रिदयातलं,
तु म्हणालीस अरे वेड्या कसं शक्य आहे ते?
माझ घर सावलीतलं अन तुझ मात्र रखरखीत उन्हातल....

प्रेमविवाह

प्रेमविवाह करण खूप सोप्प वाटलं,
समाधान देणार एक सुख भेटलं,
तिच्या मनासारखच मीही वागलो,
घरच्यांपासून मात्र सहज मी दुरावलो,

... आई बाबांना प्रेम विवाह नको होता
माझा मात्र पुरता हट्ट होता,
त्यांना फक्त मी हवा, पण ती नको होती,
अवस्था तर तळ्यात - मळ्यात होत होती,

व्यक्त हे दुखं तरी कुणाकड करावं,
कुणाला धरावं अन कुणाला सोडावं,
न सुटणाऱ्या यक्ष -प्रश्नात सापडलो,
अश्वथाम्यागत वेदना घेऊन भटकलो ,

तिला कधीतरी बाळाची चाहूल झाली,
बाप म्हणून घेताना, छाती फुल झाली,
कळल तेव्हा ,मायबापाचा जीव काय असतो,
खरच एक मुलगा, मायबापासाठी काय असतो,

जुन्या गोष्टी विसरत, तिला साथ देत गेलो,
लाडक्याचे बोबडे बोल ऐकत गेलो,
घरच्यांचं पण मन त्याकरिता पाझरल,
घरटे सोडून गेलेल्यांना बोलावन आलं

प्रेमविवाह करण खूप सोप्प वाटलं,
समाधान देणार एक सुख भेटलं,

बाबा आपली जात कोणती हो?

जन्मल्यापासून पाच वर्षाचा होईपर्यंत आयुष्य फार छान असतं... तुमचे फार लाड होतात, तुम्हाला सगळे उचलून घेतात... काही जन प्रेमाने किस करतात.... आयुष्याचा सगळ्यात चांगला काळ असते - लहानपण...!!! लहानपणापासून जे माहिती नसतं ते येतं शाळेत नाव घालताना... शालेमध्ये नाव घालताना तुम्हाला पहिल्यांदा जात चिकटते जी मरेपर्यंत आणि मेल्यावर सरणावरही सुटत नाही... कारण मेल्यावर तुमच्या आस पास जी माणसं असतात ती बहुतेक करून तुमच्या जातीचीच असतात.
मला जात, धर्म, पंथ याचा काहीही संबंध नकोय माझ्या आयुष्यात...!!! मला आयुष्य हवंय पण त्याबरोबर इतर बंधनं नकोयत... कुणाशी लग्न करायचे... आमक्या जातीची सून नक्को...!!! आमक्या जातीत माझी मुलगी द्यायची नाही... कुणाची मुलगी सून म्हणून आणायची... असे काही नक्कोय...!!!



माझी अखेरची एकच इच्छा आहे - मला माझ्या मुलाने / मुलीने कधी विचारायला नक्को आहे "बाबा आपली जात कोणती हो?"

न संपणारा प्रवास...!!!

मी चालायला सुरू केले तेव्हा माझ्याबरोबर प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक वर्गात ५० विद्यार्थी होते... म्हणजे समजा मी १० वीचा एक टप्पा, १२ वीचा एक टप्पा, ग्रॅजुयेशन एक आणि पोस्ट ग्रॅजुयेशनचा एक असे चार टप्पे पकडले तर माझ्या बरोबर एकूण किमान २०० लोक चालत होते... बरेच जन १० वी नंतर गायब झाले... त्यातले काही जण आपला वडीलोपर्जित धंदा चालवत आहेत, काही जण स्वताचा धंदा करीत आहेत, १२ वीचे काही इंजिनीयर झाले, काही केमिस्ट्रीचे काम करतात, काही शिक्षक झाले...



थोडक्यात बरेच जण ज्यांनी माझ्याबरोबर प्रवास चालू केला त्यांनी कुठे ना कुठे तरी आपले बस्तान बसवलेय...!!! याचे कारण त्यांचा फोकस असावा...!!! पण आजही माझा प्रवास कुठे संपवायचा आहे हे ठरलेले नाही... चालणे चालूच आहे, अंतहीन, दिशाहीन... क्षितीजाकडे जाणारा प्रवास संपत नसतो...!!!

प्लीज - मला माफ करशील ?"

त्याला ती एका पार्टीत भेटली. खुप सुंदर होती ती. साहजिकच तिच्या मागे खुपजण होते.ती सुंदर होती, बुध्दिमानही होती. सर्वांनाच हवीहवीशी वाटणारी. पण ती कोणालाच जवळीक साधु देत नव्हती.
तो फार साधा. आर. के. लक्ष्मणच्या 'कॉमनमॅन' सारखा. त्याला तर त्याचे मित्रही भाव देत नव्हते. मग तिच्यासारख्या मुली तर चंद्राइतक्या अप्राप्यच! तिचं त्याच्याकडं लक्षही नव्हतं त्या पार्टीत. आपल्याच विश्वात मश्गुल होती ती!
पण आपण धाडस करायचच, असं ठरवून, सारं बळ एकवटुन त्यानं तिला विचारलं, 'तु पार्टी संपल्यावर माझ्याबरोबर कॉफी प्यायला येशील?' तिला 'नाही' म्हणणं फार सोप्पं होतं. पण त्याच्या डोळ्यांतले नितळ, पारदर्शी भाव आणि आवाजातलं आर्जव जाणुन तिला का कोण जाणे, 'हो' म्हणावसं वाटलं. ती 'हो' म्हणाली आणि त्याचं टेन्शन शतपटीनं वाढलं. या शक्यतेचा त्यानं विचारच केला नव्हता!
जवळच्याच कॉफी पार्लरमध्ये दोघं कोप-यातल्या टेबलावर बसली. कॉफीची ऑर्डर दिली. पण काय बोलायचं, हे त्याला सुचेचना! तो खुपच नर्व्हस झाला होता. आणि या गप्प गप्प अशा विचित्र डेटनं तीसुध्दा अवघडली. झक मारली आणि याला हो म्हटलं, असंही मनात आलं तिच्या!
कॉफीचा एक घोट पोटात गेल्यावर अचानक त्याला कंठ फुटला. त्यानं वेटरला हाक मारली.
वेटर प्रश्नार्थक चेह-यानं टेबलाजवळ येऊन उभा राहीला. तो म्हणाला, 'थोडं मीठ देता? मला कॉफीत टाकायचंय!' सारं कॉफी शॉप या अनपेक्षित मागणीनं गोंधळात पडलं. विचित्र नजरेनं सारे त्याच्याकडे पाहु लागले. तीसुध्दा!
वेटरनं मुकाट्याने मीठ आणुन दिलं आणि देताना - "कैसे कैसे लोग आते है!" अशा अर्थाचा चेहराही केला. त्यानं मीठ कॉफीत टाकलं आणि तो कॉफी पिऊ लागला! ती खरंच गोंधळली होती. अशी विचित्र डेट आणि आता कॉफीमध्ये चक्क मीठ! अखेरीस तिनं विचारलंच "पण तुला ही अशी जगावेगळी सवय कशी काय लागली?"
"माझं लहानपण समुद्रकाठी गेलं..." शब्दांची जुळवाजुळव करत तो म्हणाला... "सारखा मी समुद्राच्या पाण्यात खेळत असे. आई कॉफी प्यायला हाक मारायची, तसा मी धावत धावत व्हरांड्यात येई आणि खारटलेल्या पाण्यानं खारटलेली बोटं बशीतल्या कॉफीत बुडवून पीत असे. आता आई राहिली नाही. आणि ते समुद्रकाठचं घरही. पण खारट कॉफीची चव जिभेवर आहे. खारटलेल्या कॉफीनं मला लहानपणच्या आठवणी पुन्हा टतात. ती चव बरोबर सगळं बालपण घेऊन येते..." भरलेल्या डोळ्यांनी तो म्हणाला. तिचं ह्र्दय भरून आलं - त्याच्या निरागसतेनं. किती हळुवार होतं त्याचं मन. मग तीही बोलली... आपल्या दुरवरच्या घराबद्दल, बाबांबद्दल... तिच्या स्वप्नांबद्दल...
खरचं खुप छान डेट झाली ती!



मग ते पुन्हा पुन्हा भेटत राहीले. अखेर तिला पटलं, हाच आपला जीवनसाथी. तो शांत होता. संयमी होता. हळुवार होता. तिची काळजी घेणारा होता. मग एके दिवशी दोघांनी ठरवलं आणि लग्न केलं! चार-चौघांसारखं आयुष्य सुरु झालं आणि दिवस खुप मजेत जाऊ लागले. एखाद्या परीकथेसारखे. खरंच त्यांचं आयुष्य खुप सुखी होतं. ती त्याच्यासाठी सर्वकाही करायची. कॉफीसुध्दा! आणि हो, त्याच्या बालपणाशी त्याची नाळ जोडलेली राहण्यासाठी चिमुटभर मीठही टाकायची त्या कॉफीत! अशीच भर्रकन ४० वर्षं कधी उडुन गेली, ते कळंलच नाही. एके रात्री तो झोपला, तो पुन्हा कधीच न उठण्यासाठी...! काही दिवसांनी ती सावरली. रोजचे व्यवहार नेहमीप्रमाणे करू लागली.
एकदा सहज म्हणुन त्याचं पुस्तकांच कपाट आवरायला घेतलं असताना तिला त्यात एक चिठ्ठी सापडली. त्याच्या अखेरच्या दिवसात त्यानं ती कधीतरी लिहीली होती.

"माझ्या प्रिये, मला माफ कर! आयुष्यभर मी तुझ्याशी एका बाबतीत खोटं वागलो, त्याबद्द्ल मला क्षमा कर! हे एकच असत्य मी तुझ्याशी बोललो... पहिल्यांदा आणि शेवटचं! आयुष्यभर ही खंत मला जाचत राहिली. पण मी कधी तुला खरं सांगण्याची हिंमत करू शकलो नाही... केवळ तु मला खोटारडा म्हणशील आणि मी तुला गमावून बसेन या भीतीने!
प्रिये, आपण सर्वप्रथम जेव्हा कॉफी पार्लरमध्ये भेटलो, तेव्हा मला कॉफीमध्ये घालण्यासाठी खरं तर साखर हवी होती! त्या क्षणाला मी इतका नर्व्हस झालो होतो, की मी साखरेऐवजी चुकून मीठ मागितलं वेटरकडे आणि मग त्या विषयावरून आपलं संभाषण सुरू झालं म्हणुन मी ते तसंच पुढे चालवून घेतलं... खारट कॉफी मला आवडत नाही. किती विचित्र चव ती! पण मला तु खुप आवडतेस... आणि तुला गमावू नये म्हणुन आयुष्यभर मी खारट कॉफी मी पीत राहिलो. ...आता मरण्याआधी मी तुझ्यापाशी सत्य उघड केलंच पाहीजे. नाही तर हे खोटेपणाचं ओझं मी पेलू शकणार नाही! प्लीज - मला माफ करशील ?"

ज्याला नाही कुणी त्याला .....

काही माणसे गेल्यावर कधीच दु:ख होत नाही... आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात ज्यावेळी तुम्हाला विचार करावा लागतो की ही गोष्ट धरायची की सोडायची पण असे अनेक क्षण येतात ज्यावेळी निर्णय पटकन होतात... मनाच्या कोप-यात सुद्धा यत्किन्चितही भीती नसते की या निर्णयाने पुढे काय होईल... कसा ठरेल हा निर्णय - योग्य की अयोग्य...!!!



माझ्या २७ वर्षांच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग आले ज्यावेळी निर्णय घेणे अवघड होते... माझ्या ग्रॅजुयेशन नंतर काय करायचे, पि.जि. नंतर काय, किंवा आत्ता काय, लग्न कुणाबरोबर करायचे, राहायचे कुठे (सेट्टल की काय ते?) व्हायचे... आयुष्य काय म्हणून काढायचे - एक शिक्षक की संशोधक, संगणक क्षेत्रात काही करायचे की सिनेमात जायचे.... पण एका सुद्धा वेळी योग्य निर्णय घेता आला नाही... किंबहुना योग्य निर्णय म्हणजे काय हेच कळले नाही, पदरी पडले आणि पवित्र झाले असे जे येईल समोर ते आपले ध्येय मानून फॉलो करत राहिलो आणि आज जिथं उभा आहे - एक प्रवासी म्हणून ज्याला पुढचा रस्ता माहिती नाही, ज्याचा पुढे जायचा मॅप हरवलाय... !!!



खूप विचार करून निर्णय घेतला किंवा न विचार करता घेतला की असंच काहीतरी होत असावं... मी कधी योग्य निर्णय घेतले नाहीत. आळस केला... सगळे माझ्याभोवती असायचे, माझे फ्रेंड्स म्हणून काही साथीदार म्हणून तर काही फक्त कलिग्ज म्हणून... मला फरक करता आला नाही - सगळे माझ्या भोवती जमले होते कारण त्यांना माझ्याकडून काही ना काही पाहिजे होते. सगळे माझा फायदा घेत गेले आणि मी त्यांना घेऊ देत गेलो, काहींनी माझे शारीरिक श्रम वापरले (माझी एक्स जि.एफ.), ब-याच लोकांनी माझ्याकडील थोड्याफार वित्ताचा फायदा करून घेतला....
माझं ब-यापैकी असं झाला होतं - ज्याला नाही कुणी त्याला "राहुल महामुनी"


...

हाउ टू वेस्ट युवर लाइफ...?

ब-याचदा ब-याच लोकांना माहिती नसतं काय करायचाय... काय व्हायचं लाइफ मध्ये... भटकणे हा त्यांचा धंदा असतो आणि त्यालाच ते आपल्या ध्येयापर्यंत पोचायाचा मार्ग समजतात... मग सुरू होतो एक खेळ - हाउ टू वेस्ट युवर लाइफचा...!!!

माझ्या आयुष्याचा बराचसा वेळ असाच गेला... नक्की काय करायचे हे माहिती असताना ते न करता इतर गोष्टींवर कॉन्सेंट्रेट करणं, त्यांना फार प्राइयारिटी देणं, त्यांच्यातच वेळ खर्ची घालणं, समजत असून मुद्दामहून जे करायला पाहिजे ते टाळणं, त्याच्या कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणं... माझा एक मित्र याला फोकस्ड नसणं आसाम म्हणतोय आणि मला कोणाच्या तरी कॅन्सल्टन्सिची गरज आहे अस त्याला वाटतंय...

ऑनलाइन सॅर्फिंग करणं, टाइम वेस्ट करणं, पोटेन्षियल वेस्ट करणं याचे कधी क्लासेस निघाले तर माझा क्लास तुफान चालेल... मला माझी पी. एच. डी. करायची नव्हती, मला बॉटेनी मध्ये रिसर्च करायचच नव्हता, मला बोटॉनिस्ट होण्यात काही इंट्रेस्ट नव्हता, माझ्या समोर ध्येय होते ते फक्त माझ्या एक्स जि.एफ.शी लग्न करायचे, त्यासाठी मिळेल तो जॉब स्वीकारला, आणि आज मी जिथं उभा आहे तिथं पोचलो, अगदी अपघातानच....
नशिबात असेल ते आणि आहे तेंव्हाच ते मिळणार... तू किती पण हात पाय हालव नाहीतर शांत बस... अस जेव्हा ती म्हणायची तेंव्हा नि तिला हसायचो... एकदा तिच्या तोंडातून चुकुन एक वाक्य आलं "आज हास मला, पण देवा करो आणि असा दिवस न येवो तुझ्या आयुष्यात जेव्हा जग तुला हसेल..." परत चुकचुकली... "मी अस म्हणायलो नको होतं, जिभेवर सरस्वती बसते...."

खरच होतं ते... आज मी स्वताला काहीच नाही असा वाटू लागलोय....!!!
तिचं खरच व्हायला लागलंय... "कदाचित तिच्या जिभेवर खरच सरस्वती बसली होती...!!!"

माझी नवी इनिंग...!!!

काय लिहायचं, मनात काय चाललय ए की जे लिहू वाटतय ते या प्रश्नाचे उत्तर मिळत नव्हते म्हणून बरेच दिवस काही लिहिता आले नाही. त्यातच एक दुसरा ब्लॉग जन्माला घालायचे डोक्यात आल्याने मग ब-याच गोष्टी मागे पडत गेल्या आणि त्याचे पर्यवसान काहीच न लिहिण्यात झाले...



सांप्रत, मी इथे काही लिहीण्याअगोदर रिफ्रेश वगैरे व्हावे असे मनात होते. त्यासाठी माझ्या नवीन ब्लॉगचा मला छान उपयोग होईल, कारण तिथे मी माझ्या आयुष्याच्या गुलाबी आठवणींची साठवण बाहेर काढतोय... माझ्याकडून अनेक चुका झाल्या यात काहीच वाद नाहीए, पण माझ्या आयुष्यात एक जण अशी आली की जिणे माझ्यातला मी बाहेर काढून ठेवला (किंबहुना तिला तो योग्य माहिती असावा...!!!) पण तिने मला सोडून जाण्याचा विचार कधी काळी मला हेलावून टाकायचा, पण आज ती कोण्या दुसा-याच्या मुलीची आई आहे, आणि हे सत्य स्वीकारण्यावाचून गत्यंतर नसलेला मी आजही तिथेच आहे, जिथे ती मला सोडून गेली होती...!!! एक इंच भर देखील मी अडिशन करू शकलो नाही की काही शिकू शकलो नाही... पण आज माझ्या त्या ब्लॉगवरच्या माझ्या आठवणींची साठवण बाहेर काढण्याचे कारण म्हणजे माझ्या चुका कॉपी करून तसेच आयुष्य जगण्यापासून कोणाला तरी वाचवता आले तर बरं होईल.... (माझा स्वार्थ म्हणजे माझ्या चुका ह्या कॉपीराइटेड असल्याने त्या कुणी पुन्हा कॉपी करू नयेत, म्हणजे युनिकनेस का काय ते राहील...!!!)
असो, माझ्या नव्या ब्लॉगचा अड्रेस लवकरच देईन सगळ्यांना...
आपला,
चहाडा मित्र!

ती जाताना 'येते' म्हणून गेली

ती जाताना 'येते' म्हणून गेली
अन जगण्याचे कारण बनून गेली!

म्हटली मजला 'मनात काही नाही'
पण जाताना मागे बघून गेली!

तिच्या खुणेची चंद्रकोर ही गाली
वार नखाचा हलके करून गेली...

घडे क्षणांचे रिते असे केले की
देहसुखाचा प्याला भरून गेली

कळते हा बगिचा का फुलला माझा
काल म्हणे ती दारावरून गेली!

तसे पाहता पाउस तितका नव्हता
कळे न का ती इतकी भिजून गेली...

तिच्या भोवती गंध अता दरवळतो
(सहवासचे अत्तर टिपून गेली!)
- प्रसाद शिरगांवकर

(प्रसाद शिरगांवकरांची कविता फार आवडली, ती तुम्हाला पण आवडेल अशी आशा आहे...!!!)

माझ्या मना रे ऐक जरा...!!

माझ्या मित्रांना माहिती आहेच की माझ्या मनाची अवस्था गेली वर्षभर काय असावी? कारण त्यांना माझ्या आयुष्यातल्या घडामोडी जरा जास्तच जवळून माहिती आहेत... माझे प्रेम, त्याचे अपूर्णत्व आणि त्यानंतर झालेल्या घटना, त्यांचा माझ्या मनावर झालेला परिणाम हे सगळ त्यांना व्यवस्थित माहिती आहेच..!! पण बर्‍याचशा गोष्टी मला नंतर कळल्या, ती गेल्यावर, त्या आधी कळल्या असत्या तर त्याच्या फार चांगला इंपॅक्ट झाला असता, कदाचित जेवढा त्रास झाला तेवढा झाला नसता?


माझ्या आयुष्यात ती आली, ते तिच्या मर्जिने, तिच्याच हट्टाने !!! तीनच नाते वाढविण्याचा हट्ट केला, नेहमीच...!!! जेव्हा जेव्हा मी तिला आवर घालू इच्छीला तेव्हा तेव्हा त्याचा अर्थ वाईटच घेतला...!!! तिला वाटायचे की, मी तिला टाळतोय, तिच्या जातीमुळे, आणि मी तिला सोडणार वगैरे काही तरी आहे असे काहीतरी...!!!
पण झाले उलटेच, मी तिला सोडायाचे वगैरे सोडाच, तिने मला "चांगली संधी" आली तेव्हा अलगद तिच्या आयुष्यातून काढून टाकले, अगदी अ ल ग द ...!!!



मग उरल्या, तिच्या आठवणी आणि काही प्रश्न... तिने असे का केले? असे काय मी केले ज्यामुळे तिने असा निर्णय घेतला, किंवा तिला घ्यावा लागला !!! माझ काय चुकल? नक्की काय?
न सांगता कुणी बोलणे सोडावे, किंवा तुम्ही बोलत असताना सगळ छान चालले असताना कुणी तरी अचानक काहीही कारण नसताना इग्नोर कराव यासारख दु:ख ते कशात? मला आज सुद्धा माहिती नाही की तिला किती फरक पडला असता माझ्याशी लग्न करून पण मला पडला असता, नव्हे पडलाय...! तिच्या मनातले योग्य वेळी कळले असते तर...? खूप बर झाले असते, कारण माझ्या आयुष्याची वाया गेलेले दिवस मला कामासाठी मिळाले असते (वास्तविकत: तिने मला ते वाया घालव असे सांगितले नसतानाही...!!!)



तिची आठवण येतेय असे म्हणून पण काही उपयोग नाही... आज मी एकटा आहे हे सत्य आहे... आणि कदाचित तिला याचा काही फरक पडत नसावा... कारण स्वत:च्या आयुष्यात फरक ना पाडू शकणारा मी कुणाच्या आयुष्यात
नसन्याने कुणाला काय फरक पडणार?


"याबद्दल न विचारले तर बरे होईल?"
प्लीज....!!!

शब्द माझ्या मनातले...

काहींना सगळ्या गोष्टी सहज मिळतात, काहींना भांडून, काहींना हिसकावून, तर काहींना काहीही केल तरी नाही... एका मित्राची गोष्ट, जी मला इथ नमूद करावी वाटते... लहानपणापासून त्याच्याकडे काहीही कमी नव्हत पण एक गोष्ट मात्र त्याला अलाउड नव्हती, ती म्हणजे स्वताच्या आयुष्याचे स्वत: निर्णय घ्यायचा...!!! काहीही झाले तरी नाही, आणि या काहीहीच्या नादात त्याने स्वत:च्या आयुष्याची वाट लावून घेतली... मार्ग अनेक आहेत त्याच्यापुढे, स्वताला संपवायचे, निघून जायचे, किंवा आहे तसे जगायचे...!!! आणि त्याने मार्ग निवडलाय आहे असे जगायचे... आणि तो पण निर्णय त्याचा नाही, नेहमीप्रमाणे...!!!

त्याच्या उन्यापुर्‍या २५ - २६ वर्षाच्या आयुष्यामध्ये बर्‍याच गोष्टी मनाविरुद्ध झाल्या पण त्याना रिआक्ट न करण हे त्याच्या अंगवळणी पडलय... आणि म्हणूनच त्याच्या आयुष्यात त्याला इण्टरेस्ट नाहिये बहुदा...!!!

त्याला त्याच्या वडिलाचे राहिलेले आयुष्य जगायचे असे त्याला वाटते, त्याचे विचार, त्याच्या कृती यांना काहीही महत्व नाही आणि त्या मांडल्या तरी त्याचा काही उपयोग नाही असे त्याच्या मनात येते, निगेटीव्ह व्हायला लागलाय, त्याचा "तो काही तरी करू शकतो" हा आत्मविश्वास संपू लागलाय...!!! त्याच्या भविष्यासाठी हे बरोबर नाही, पण त्याला हे समाजात नाही. वडिलांवरच्या अतीव प्रेममुळे, त्याच्या रिस्पेक्टमुळे किंवा त्यांच्या भीतीने त्याला गप्प केलेय, आणि त्याच्यातला "तो" कधीच संपलाय...!!!

त्याला गरज आहे, "जे त्याला हव आहे ते करण्याची..." कारण आयुष्यभर तो तेच काम करणार आहे, त्याला हवा आहे एक साथीदार जो त्याच्या आयुष्याचे एकांगी निर्णय घेण्याच्या आणि तो निर्णय शांतपणे ऐकून घायच्या प्रोसेसमुळे गेलाय... त्याचे दु:ख मनात आहेच, पण सध्या त्याच आयुष्य चांगले व्हायचे असेल तर, त्याला त्याचे आभाळ गावसण्याची एक संधी त्याच्या घरच्यांनी द्यावी असे मला वाटतेय...!!!

का माहिती नाहीए, हे लिहिताना माझ्या हाताला झणझान्या यायला हव्या होत्या, पण त्या मेंदूला येतायत..!!!
त्याने निर्णय घेणे आवश्यक आहेच, आणि तो पण लवकर...!!! त्याचा साथीदार, त्याचे आयुष्य आणि त्याचा वेळ... यापैकी काय आणि कधी? माहिती नाहिये!!!

काही वेळा काही बोलता आले नाही तरी, गप्प राहणे हा पर्याय नसतो!!!

मी तसा थोडासा लाऊड वगैरे काही तरी वाटतो, जे मला पहिल्यांदा ऐकत असतात त्याना...!!! माझ्या आयुष्यात बर्‍याच घटना आल्या ज्यावेळी माझ्या परिस्थितीचा विचार न करता, परिणामाची चिंता न करता बोललो, अगदी अस असताना की, आय हॅव टू लुझ माय जॉब...? पण माझ्यापुढे पर्याय नसला तरी, आणि असला तरी पण मी सेल्फ रीस्पेक्ट पुढे काही करू शकतो, हे मला नंतर विचार करताना जाणवते...!!!

माझ्या उण्यापुर्‍या २७ वर्षांच्या आयुष्यामध्ये मी असाच वागत आलो, असे समजून की, हेच बरोबर आहे... पण आता समजतय की, नेहमी अस वागुन चालत नाही... काही वेळेला मोठी उडी मारायची असेल ना, की थोडे मागे आलेले बरे असते, त्याने उडी लांब जाते, असे वाठारे गूरुजीनी पहिलीमधे संगिताल्याचे आठवते, वाठारे गुरुजी कुठे आहेत हे माहिती नाही, पण त्यानी सांगितलेले शब्द बरोबर आहेत, अजुन...!!!



मनाच्या गाभार्‍यात काही गोष्टी दफन केल्या तर बर्‍या असतात, तशीच काही नाती असतात, ज्याना नाव न देता ती सांभाळावी लागतात, नाव नसल म्हणून काही त्या नात्यांचे महत्व कमी होत नाही... पण त्याच नाव सांगण्याची वेळ आल्यावर योग्य नाव नसल्याने त्याच्यावर बोट उठु शकत...!!!

का कुणास ठाउक पण काही वेळा काही बोलता आले नाही तरी, गप्प राहणे हा पर्याय नसतो!!!

फुलस्टॉप आणि कॉमाज...!!!

समाजातल्या सर्वच घटनाकडे आपण एकदम सिरियसली बघत नसावे... पण काही घटना मनावर फार खोलवर रुतून बसतात... परवा ९ एप्रिल २०१०. सर्वासाठी एकदम जनरल दिवस असावा, पण माझ्या आयुष्यात खास... खास अनेक कारणानी, या दिवशी अनेक घटना झाल्या माझ्या आयुष्यात, पण काही गोष्टी झालेल्याचे कधीच दु:ख करायचे नसते ना, त्यापैकी बहुतेक होत्या...!!!
आयुष्य एकदाच मिळते आणि ते तसच जगाव या मताचा मी... माझ्या आयुष्यात अनेक कॉमाज पडले.... पण आता फूलस्टॉप...
पण फूल स्टॉप पण तसाच पाहिजे... अगदी फूलस्टॉप शोभण्यासारखा !!!
आहे एक डोक्यात पण बघुया काय होतय ते !!!
लेटस् होप फॉर द बेस्ट !!!

उत्तर मात्र शून्य...!!!

काही गोष्टी फार चांगल्या असाव्यात अस आपल्याला नेहमी वाटते... आपल्या सभोवताळाची माणसे, त्यांचे स्वभाव, आपली परिस्थिती, आपले वर्तमान, किंबहुना आपले भविष्य... पण सगळ्याच गोष्टी आपल्या मानासारख्या होत नाहीत... बर्‍याचदा नाहीच.... शक्य तेवढे सगळे प्रयत्न करून पण होत नाहीत. मी माझ्या भविष्याबद्दल कायच्या काय कल्पना करून ठेवल्या होत्या... अगदी फिल्मी स्टाइल...
पण आळस काहीच शक्य नाही झाले आणि मी जसा आजा आहे, तसा झालो... कंप्यूटरची फार आवड, पण काहीच करता आले नाही... चित्रकलेची आवड पण ते पण शक्य झाले नाही... जे आयुष्यभर अव्होइड करत आलो, तेच पदरी पडले... आणि आयुष्याची कॅलक्युलेशन केल्यावर आपणाला काय मिळाले याचे उत्तर एक लाइफ जे सर्वानी आपल्यासाठी चांगले केले... पण आपण काय परत दिले सगळ्याना याच उत्तर मात्र शून्य आले... असे कसे होऊ शकते, कोणास ठाउक, पण असे झालेय असे मला का कुणास ठाउक?
मला कायम असे वाटते की, मी एखाद्या सेटल्ड मुलीशी लग्न करावे, त्याचे कारण म्हणजे जे आयुष्यात करावयाचे राहिलेय ते मला करता येईल, पोसिबल्ली... पण, पण तिने माझ्याशी का लग्न करावे याचे उत्तर माझ्याकडे नाही... शेवटी तिच्या मनाचा पण विचार करण इंपॉर्टेंट आहेच ना...!!!
आय कॅन नॉट बी सो सेल्फीश !!!
not at least wid her lyf's sacrifice !!!
Leaving the things back to my states - two states of my mind !!!
Rahul...!

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचय
रोज सकाळी खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हाणायचाय
नव्या वहिचा वास घेत पहिल्या पानावर
छान अक्षरात आपल नाव लिहायचाय
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

मधली सुट्टी होताच वाटरब्याग सोडुन
नलाखाली हात धरून पानी प्यायचाय,
कसाबसा डबा सम्पवत तिखट मीठ लावलेल्या
चिन्चा, बोर, पेरु, काकडी सगळ खायचय
सायकलच्या चाकाचा स्ट्म्प करुन क्रिकेट खेलायचय,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

उद्या पाऊस पडुन शालेला सुट्टी मिलेल का?
हा विचार करत रात्री झोपी जायचय,
अनपेक्षित मिळणारा सुट्टीच्या आनन्दासाठी,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

घन्टा व्हायची वाट का असेना
मित्राशी गप्पा मारत वर्गात बसायचाय,
घन्टा होताच मित्राशी सयकलची रेस लावून घरी पोहचायचय,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

कितीहि जड असुदे... जबाबदारीच्या ओझ्यापेक्षा
दप्तराच ओझ पाठिवर वागवायचय,
कितीहि उकडत असू दे.. वातानुकूलित ऒफ़िसपेक्षा
पन्खे नसलेल्य वर्गात खिड्क्या उघडून बसायचय,
कितीहि तुटका असु दे.. ऒफ़िसमधल्या एकट्या खुर्चिपेक्षा दोघान्च्या बाकावर ३ मित्रान्नी बसायचय
- अनामिक कवी

मला ऑनलाइन सर्च करता करता ही कविता मिळाली, आणि मना थांबले... सगळे सोडून शाळेचे दिवस आठवले...!
लहानपणिचा वेड्या गोष्टी, निरनिराळे खेळ, आणि मज्जा... म्हणून हो पोस्ट... अनामिक कवीचे अनेक आभार...!!!! मला परत काही वेळासाठी का असेना लहान केल्याबद्दल!!
!

फ़क्त एकदाच

फ़क्त एकदाच तुला मनसोक्त हसतना पहायचय
निदान त्यासाठी तरी मला विदुशक बनुन तुज़्या समोर यायचय

फ़क्त एकदाच तुज़्या मनातले सारे काही जाणुन घ्यायचय ,
निदान त्यासाठी तरी नजरेला नजर भिडवुन तासनतास बसायचय.

फ़क्त एकदाच तुज़्या मवू केसानवरुन हळुवार हात फ़िरवायचाय ,
निदान त्यासाठी तरी एक तरी गजरा तुज़्या केसात घालायचाय ,

फ़क्त एकदाच तुला माज़्या साठी बेच्येन होताना पहायचय,
निदान त्यासाठी तरी ठरलेल्या वेळे च्या ऊशिरा यायचय.

फ़क्त एकदाच तुला अनिवार रडतना पहायचय,
निदान त्यासाठी तरी मला खोट खोट मरायचय

- अनामिक कवी

तु निघुन गेलीस

तु निघुन गेलीस, कळलेच नाही जाताना
जगच बदलेल माझे, कळले नाही तुझ्याकडे बघून हसताना........

रडू नकोस उगीच, चांगले नाही ते जाताना
माझे रडणे राहूनच गेले, तुला सगळे समजावताना................

आभाळं भरले आहे, अगदी जसे होते तु जाताना
पण आता तेही बरसत नाही, उगीचच कारण नसताना....................

अजूनही जातो त्याच बागेत, रातराणी फ़ुलताना
पण मला फ़क्त दिसते, सकाळी ती कोमेजताना...................

झालेच नाही आपले बोलणे, सगळा एकान्त असताना
आज सगळं सुचत जातय, एकटा कविता करताना................

माहीत नाही पुन्हा कधी भेटु, वेगळ्या रस्त्यावर चलताना
अन जुळतील का आपल्या तारा, वेगळ्या जगात राहताना..............

विषय शोधावे लागतील आता, संभाषण चालु असताना
सगळे तसेच राहील का गं, पुन्हा एकत्र असताना.....................

शुन्यच आहे आयुष्य माझे, उणे तु असताना
धरलास का हात सांग तु, सोडुनच जायचे असताना...............

सोन्यासारखा संसार करशील, दिल्या घरी नांदताना
सांग माझी आठवण येइल का तुला, ती बागेतली रातराणी फ़ुलताना.............
- अनामिक कवी

मी असाच आहे,

मी असाच आहे,एकटा एकटा जगणारा....
सर्वात असाताना देखील, स्वतःच्या शोधात फिरणारा.....

मी असाच आहे, खुप प्रेमाने बोलणारा....
आपल्या सरळ वागण्याणे , कुणालाही सहज आपलसं करणारा......

मी असाच आहे, जीवानाच मर्म जाणणारा....
साध्या मैत्रीच्या नात्यालाही, आपला धर्म मानाणारा.....

मी असाच आहे, दुखाःतही नेहमी हसणारा....
अन हसत हसता, नियतीला लाजवणारा....

मी असाच आहे, इतरांना सतत प्रकाश वाटणारा....
पण स्वतःहा मात्र, काळोखात आठणारा.....

मी असाच आहे, सगळ्यांपासुन दुर दुर जाणारा..
जाताना मात्र सगळ्यांच्या मनात, घर एक करुन राहणारा........


-अनामिक कवी

एकच चहा, तो पण कटींग...

एकच चहा, तो पण कटींग...
एकच पीक्चर, तो पण टेक्स फ्री...
एकच साद, ती पण मनापासुन...
अजुन काय हवे असते आपल्या मित्रांकडून

एकच कटाक्श, तो पण हळूच...
एकच होकार, तो पण लाजून...
एकच स्पर्श, तो पण थरथरून...
अजुन काय हवे असते आपल्या प्रियेकडून

एकच भूताची गोष्ट, ती पण रंगवून...
एकच श्रीखंडाची वडी, ती पण अर्धी तोडून...
एकच जोरदार धपाटा, तो पण शिवी हासडून...
अजुन काय हवे असते आपल्या आजीकडून

एकच मायेची थाप, ती पण कुर्वाळून...
एकच गरम पोळी, ती पण तूप लावून...
एकच आशिर्वाद, तो पण डोळ्यात आसवे आणून..
अजुन काय हवे असते आपल्या आईकडून.

एकच कठोर नकार स्वईराचाराला, तो पण ह्रुदयावर दगड ठेउन...
एकच सडेतोड उपदेश, तो पण घोघर्या आवाजातून...
एकच नजर अभिमानाची, आपली प्रगती पाहून...
अजुन काय हवे असते आपल्या वडिलांकडून

सगळ्यांनी खूप दिले, ते पण न मागून...
स्वर्गच जणु मला मिळाला, तो पण न मरुन...
फाटकी ही झोळी माझी, ती पण वाहिली भरुन..
अजुन काय हवे मला माझ्या आयुष्याकडून

-अनामिक कवी