लंगडा घोडा...

लहानपणापासून मी हुशार समाजाला जायचो... वडिलांच्या मार्कांच्या वलयामुळे मला हुशारीचा टॅग ऑटोमॅटिक आला होता... सगळे ठीक होत्ते पण मला अभ्यास ह्या गोष्टीचा कंटाळा यायचा... अभ्यासाच्या खोलीमध्ये निवांत झोपायचो... अगदी १० वी, १२ वी च्या परीक्षेच्या काळात पण...!!! आळशी, कशासाठी जन्म झालाय आपला हे माहिती नसलेला... दिशाहीन...!!!
बराच काळ घरात असून पण एकटा असलेला, मित्र (फारसे) नसलेला, एकटा जीव सदाशीव...!!! वडिलांची स्वप्नं खुप सारी, एकाने डॉक्टर व्हावं, एकानं इंजिनियर, मुलीने शिक्षक.... माझे सोडून सगळे झाले.... आयुष्याला दिशाच मिळाली नाही... समुद्रमध्ये नावाड्याविना भटकत आललेल्या शिडाच्या जहाजा प्रमाणे....!!! वारा माझी दिशा ठरवायचा.... मार्ग तयार करायचा प्रश्नच नव्हता.... समोर दिसेल त्या मार्गाने चालायचे एवढेच मला माहिती होते....
माझ्या मित्रांना वाटते की माझ्याकडे फार टॅलेण्ट वगैरे आहे... माझ्यात काही तरी असामान्य करायची ताकद आहे... माझ्या शिक्षकांना वाटायचे की मी वेगळा आहे... माझ्या बहिणीला देखील हेच वाटत असतं... मला वाटायचे की माझी अबिलिटी आहे म्हणूनच सगळे ऐकून घेतात... प्रेमापोटी सारे जन माझा माज, माझा गुरुर आणि माझे वागणे सहन करत होते.



मी उद्धट आहे, मानसिक रोगी आहे.... आळशी आहे... अप्पलपोटी आहे, मगरुर आहे, सायको आहे... मला जे करायचे आहे त्याची सुरूवात देखील नाही केली मी.... आणि माझे वय आज ३० च्या घरात आहे. माझ्या आयुष्याच्या शेवटी (जर तेवढा विचार करावा एवढा वेळ असे एवढा जगलो तर....) मला मी आयुष्यात काहीच केले नाही याची खंत कायम राहिली तर मग माझा अंत दुखावह आहे....
माझ्या प्रियजणांनी एका लगंड्या घोड्यावर डाव लावलाय हे मला कळून चुकलेय... बघू आता जीवनाच्या रेस मध्ये किती वेळ आणि किती लांब पळता येते ते... त्यांचा इच्छा, अपेक्षा साठी पाळायला पाहिजेच... मग माझी इच्छा असो किंवा नसो...