माझ्या मनात काय चाललेय काय माहिती...?



एक टार्गेट नसलेला माणूस... त्यामुळे ते अचिव्ह करण्यासाती लागणारी जिद्द अटोमेटीकच नसणारा... आणि अशीच लाइफ जगणार मी म्हणजे एक miracle आहे असे वाटायला लागलय... का कुणास ठौक, पण जिद्द, आशा, अपेक्षा संपल्यात... लाइफ कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला लागलाय. असे वाटते की मी असे आयुष्य जगतोय जे माझे नाहीच... उगाचच... मी राहुल महामुनी नसतो तर, तर कदाचित मी चांगला जगलो असतो... किंवा नाही... मी माझ्या मनाप्रमाणे वागू शकलो नाही म्हणून दुख आहे की मनासारख वागळो यामुळे मी दुःखी आहे. मनाला समजत नाही आणि त्यामुळे मला ठीक वाटत नाही... माझ्या वागण्याला कोणी विचित्रपणा म्हणू शकेल पण, मी काय करू...? माझ्या मनात अनेक प्रश्न आहेत... आणि महत्वाचे म्हणजे त्यांची उत्तरे निगेटीव्ह आहेत...



प्रत्येक माणूस युनिक असतो... तसा पृथीवरचा प्रत्येक इंडिविज्युअलच युनिक आहे, पण मग मला का तसे वाटत नाही.... माझ्या मनातल्या गोष्टी मलाच कळत नाहीत.. काय माहिती माझ्या मनात काय चाललेय ते?

अभिने केलेली कविता

स्पेशल वन बाय टु ची ऑर्डर असते
नुसतं एक कटींग घेत नाही
सोबतीला कोणीतरी असतंच
तु एकटा चहा पित नाही

स्पेशल वन बाय टु
जेव्हांपासून शेअर करायला लागलोय
तेव्हांपासूनच तर आपण
एकमेकांची केअर करायला लागलोय

नमस्कार मंडळी !!!

नमस्कार मंडळी !!!
" चहा पिणारा माणूस !" असं टायटल देण्यामागं माझा एका मित्राचे योगदान आहे... अभिजीत तोरणे या मुंबईच्या मित्राने.... त्याने हे नाव माझ्या आत्मचारित्रच्या टायटलसाठी ठरवले आहे... कदाचित प्रस्तावना सुद्धा तयार केली असेल एव्हाना... त्याच्यामते चहा पिणारे अनेक त्याने बघितलेत, पण "चहाडा" एकमेवच (त्याने बघितलेला).... सध्याच्या धकाधकीच्या जगात चहा हे एकमेव स्वस्त, टिकाऊ आणि सर्वांगसुंदर असे पेय म्हणून राजमान्यता असणारे आणि अतिजलद लोकमान्यता पावलेले चहा हे काफीपेक्षा common झाले आहे....
माझा point of view हां चहाबद्दल नसून तो पिणारा मी हा आहे.... माझ्या आयुष्यात येणारे, आलेले चांगले, वाईट क्षण यासाठी हा ब्लॉगचा कुटाणा....
सो एन्जॉय माय कुटाणा....
so cool, राहुल ...