माझ्या मनात काय चाललेय काय माहिती...?
एक टार्गेट नसलेला माणूस... त्यामुळे ते अचिव्ह करण्यासाती लागणारी जिद्द अटोमेटीकच नसणारा... आणि अशीच लाइफ जगणार मी म्हणजे एक miracle आहे असे वाटायला लागलय... का कुणास ठौक, पण जिद्द, आशा, अपेक्षा संपल्यात... लाइफ कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला लागलाय. असे वाटते की मी असे आयुष्य जगतोय जे माझे नाहीच... उगाचच... मी राहुल महामुनी नसतो तर, तर कदाचित मी चांगला जगलो असतो... किंवा नाही... मी माझ्या मनाप्रमाणे वागू शकलो नाही म्हणून दुख आहे की मनासारख वागळो यामुळे मी दुःखी आहे. मनाला समजत नाही आणि त्यामुळे मला ठीक वाटत नाही... माझ्या वागण्याला कोणी विचित्रपणा म्हणू शकेल पण, मी काय करू...? माझ्या मनात अनेक प्रश्न आहेत... आणि महत्वाचे म्हणजे त्यांची उत्तरे निगेटीव्ह आहेत...
प्रत्येक माणूस युनिक असतो... तसा पृथीवरचा प्रत्येक इंडिविज्युअलच युनिक आहे, पण मग मला का तसे वाटत नाही.... माझ्या मनातल्या गोष्टी मलाच कळत नाहीत.. काय माहिती माझ्या मनात काय चाललेय ते?
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment