धांदरट मुलांच्या रांगेत बसायचॊ मी अन तु बसायची हुशार मुलींच्या रांगेत,
मठ्ठ होतो मी, पण तु किती हुशार होती...
प्रार्थनेच्या वेळी तु पसायदान किती सुंदर म्हणायचीस,
... माझ्या मरगळलेल्या चेहरयावर तु अनोखे तेज आनायचीस..
माझ नाव नेहमी ब्लकलिस्ट मधे दिसायच, तुझ नाव मात्र शिक्षकांच्या तोंडून फेमस व्हायच...
तुझं हे सत्र असचं कायम राहील, माझं स्वप्न असच यशापासून दुर जात राहीलं..
तु संगीतात एक नंबर असायची खेळामधे मात्र माझीच अव्वल बाजी असायची..
मास्तरांनी माझी फजिती केली की तु किती गालातल्या गालात हसायची...
एकदा मात्र खरोखर झाली कमाल, एका नाटकात तु झाली प्रवासी अन मी झालो हमाल..
त्यावेळेस तुझ्या अभिनयाशी स्पर्धा करताना खरोखर मी झालो होतो बेहाल...
भोंडला असायचा तुम्हा मुलींचा आम्हाला मात्र सुट्टी असायाची..
पण तुला साडीत पहायचं म्हणून माझी त्या भिंतीवरून नेहमीच डोकावणी असायची..
एकदा हिम्मत केली मी अन सांगितल माझ्या ह्रिदयातलं,
तु म्हणालीस अरे वेड्या कसं शक्य आहे ते?
माझ घर सावलीतलं अन तुझ मात्र रखरखीत उन्हातल....

प्रेमविवाह

प्रेमविवाह करण खूप सोप्प वाटलं,
समाधान देणार एक सुख भेटलं,
तिच्या मनासारखच मीही वागलो,
घरच्यांपासून मात्र सहज मी दुरावलो,

... आई बाबांना प्रेम विवाह नको होता
माझा मात्र पुरता हट्ट होता,
त्यांना फक्त मी हवा, पण ती नको होती,
अवस्था तर तळ्यात - मळ्यात होत होती,

व्यक्त हे दुखं तरी कुणाकड करावं,
कुणाला धरावं अन कुणाला सोडावं,
न सुटणाऱ्या यक्ष -प्रश्नात सापडलो,
अश्वथाम्यागत वेदना घेऊन भटकलो ,

तिला कधीतरी बाळाची चाहूल झाली,
बाप म्हणून घेताना, छाती फुल झाली,
कळल तेव्हा ,मायबापाचा जीव काय असतो,
खरच एक मुलगा, मायबापासाठी काय असतो,

जुन्या गोष्टी विसरत, तिला साथ देत गेलो,
लाडक्याचे बोबडे बोल ऐकत गेलो,
घरच्यांचं पण मन त्याकरिता पाझरल,
घरटे सोडून गेलेल्यांना बोलावन आलं

प्रेमविवाह करण खूप सोप्प वाटलं,
समाधान देणार एक सुख भेटलं,