प्रेमविवाह

प्रेमविवाह करण खूप सोप्प वाटलं,
समाधान देणार एक सुख भेटलं,
तिच्या मनासारखच मीही वागलो,
घरच्यांपासून मात्र सहज मी दुरावलो,

... आई बाबांना प्रेम विवाह नको होता
माझा मात्र पुरता हट्ट होता,
त्यांना फक्त मी हवा, पण ती नको होती,
अवस्था तर तळ्यात - मळ्यात होत होती,

व्यक्त हे दुखं तरी कुणाकड करावं,
कुणाला धरावं अन कुणाला सोडावं,
न सुटणाऱ्या यक्ष -प्रश्नात सापडलो,
अश्वथाम्यागत वेदना घेऊन भटकलो ,

तिला कधीतरी बाळाची चाहूल झाली,
बाप म्हणून घेताना, छाती फुल झाली,
कळल तेव्हा ,मायबापाचा जीव काय असतो,
खरच एक मुलगा, मायबापासाठी काय असतो,

जुन्या गोष्टी विसरत, तिला साथ देत गेलो,
लाडक्याचे बोबडे बोल ऐकत गेलो,
घरच्यांचं पण मन त्याकरिता पाझरल,
घरटे सोडून गेलेल्यांना बोलावन आलं

प्रेमविवाह करण खूप सोप्प वाटलं,
समाधान देणार एक सुख भेटलं,

0 comments:

Post a Comment