काहींना सगळ्या गोष्टी सहज मिळतात, काहींना भांडून, काहींना हिसकावून, तर काहींना काहीही केल तरी नाही... एका मित्राची गोष्ट, जी मला इथ नमूद करावी वाटते... लहानपणापासून त्याच्याकडे काहीही कमी नव्हत पण एक गोष्ट मात्र त्याला अलाउड नव्हती, ती म्हणजे स्वताच्या आयुष्याचे स्वत: निर्णय घ्यायचा...!!! काहीही झाले तरी नाही, आणि या काहीहीच्या नादात त्याने स्वत:च्या आयुष्याची वाट लावून घेतली... मार्ग अनेक आहेत त्याच्यापुढे, स्वताला संपवायचे, निघून जायचे, किंवा आहे तसे जगायचे...!!! आणि त्याने मार्ग निवडलाय आहे असे जगायचे... आणि तो पण निर्णय त्याचा नाही, नेहमीप्रमाणे...!!!
त्याच्या उन्यापुर्या २५ - २६ वर्षाच्या आयुष्यामध्ये बर्याच गोष्टी मनाविरुद्ध झाल्या पण त्याना रिआक्ट न करण हे त्याच्या अंगवळणी पडलय... आणि म्हणूनच त्याच्या आयुष्यात त्याला इण्टरेस्ट नाहिये बहुदा...!!!
त्याला त्याच्या वडिलाचे राहिलेले आयुष्य जगायचे असे त्याला वाटते, त्याचे विचार, त्याच्या कृती यांना काहीही महत्व नाही आणि त्या मांडल्या तरी त्याचा काही उपयोग नाही असे त्याच्या मनात येते, निगेटीव्ह व्हायला लागलाय, त्याचा "तो काही तरी करू शकतो" हा आत्मविश्वास संपू लागलाय...!!! त्याच्या भविष्यासाठी हे बरोबर नाही, पण त्याला हे समाजात नाही. वडिलांवरच्या अतीव प्रेममुळे, त्याच्या रिस्पेक्टमुळे किंवा त्यांच्या भीतीने त्याला गप्प केलेय, आणि त्याच्यातला "तो" कधीच संपलाय...!!!
त्याला गरज आहे, "जे त्याला हव आहे ते करण्याची..." कारण आयुष्यभर तो तेच काम करणार आहे, त्याला हवा आहे एक साथीदार जो त्याच्या आयुष्याचे एकांगी निर्णय घेण्याच्या आणि तो निर्णय शांतपणे ऐकून घायच्या प्रोसेसमुळे गेलाय... त्याचे दु:ख मनात आहेच, पण सध्या त्याच आयुष्य चांगले व्हायचे असेल तर, त्याला त्याचे आभाळ गावसण्याची एक संधी त्याच्या घरच्यांनी द्यावी असे मला वाटतेय...!!!
का माहिती नाहीए, हे लिहिताना माझ्या हाताला झणझान्या यायला हव्या होत्या, पण त्या मेंदूला येतायत..!!!
त्याने निर्णय घेणे आवश्यक आहेच, आणि तो पण लवकर...!!! त्याचा साथीदार, त्याचे आयुष्य आणि त्याचा वेळ... यापैकी काय आणि कधी? माहिती नाहिये!!!
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment