माझ्या मित्रांना माहिती आहेच की माझ्या मनाची अवस्था गेली वर्षभर काय असावी? कारण त्यांना माझ्या आयुष्यातल्या घडामोडी जरा जास्तच जवळून माहिती आहेत... माझे प्रेम, त्याचे अपूर्णत्व आणि त्यानंतर झालेल्या घटना, त्यांचा माझ्या मनावर झालेला परिणाम हे सगळ त्यांना व्यवस्थित माहिती आहेच..!! पण बर्याचशा गोष्टी मला नंतर कळल्या, ती गेल्यावर, त्या आधी कळल्या असत्या तर त्याच्या फार चांगला इंपॅक्ट झाला असता, कदाचित जेवढा त्रास झाला तेवढा झाला नसता?
माझ्या आयुष्यात ती आली, ते तिच्या मर्जिने, तिच्याच हट्टाने !!! तीनच नाते वाढविण्याचा हट्ट केला, नेहमीच...!!! जेव्हा जेव्हा मी तिला आवर घालू इच्छीला तेव्हा तेव्हा त्याचा अर्थ वाईटच घेतला...!!! तिला वाटायचे की, मी तिला टाळतोय, तिच्या जातीमुळे, आणि मी तिला सोडणार वगैरे काही तरी आहे असे काहीतरी...!!!
पण झाले उलटेच, मी तिला सोडायाचे वगैरे सोडाच, तिने मला "चांगली संधी" आली तेव्हा अलगद तिच्या आयुष्यातून काढून टाकले, अगदी अ ल ग द ...!!!
मग उरल्या, तिच्या आठवणी आणि काही प्रश्न... तिने असे का केले? असे काय मी केले ज्यामुळे तिने असा निर्णय घेतला, किंवा तिला घ्यावा लागला !!! माझ काय चुकल? नक्की काय?
न सांगता कुणी बोलणे सोडावे, किंवा तुम्ही बोलत असताना सगळ छान चालले असताना कुणी तरी अचानक काहीही कारण नसताना इग्नोर कराव यासारख दु:ख ते कशात? मला आज सुद्धा माहिती नाही की तिला किती फरक पडला असता माझ्याशी लग्न करून पण मला पडला असता, नव्हे पडलाय...! तिच्या मनातले योग्य वेळी कळले असते तर...? खूप बर झाले असते, कारण माझ्या आयुष्याची वाया गेलेले दिवस मला कामासाठी मिळाले असते (वास्तविकत: तिने मला ते वाया घालव असे सांगितले नसतानाही...!!!)
तिची आठवण येतेय असे म्हणून पण काही उपयोग नाही... आज मी एकटा आहे हे सत्य आहे... आणि कदाचित तिला याचा काही फरक पडत नसावा... कारण स्वत:च्या आयुष्यात फरक ना पाडू शकणारा मी कुणाच्या आयुष्यात
नसन्याने कुणाला काय फरक पडणार?
"याबद्दल न विचारले तर बरे होईल?"
प्लीज....!!!
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment